लेखक दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी केली आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा..




     लेखक दिग्दर्शक दिलीप भोसले 

मुंबई : - लेखक दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात :

नवीन मराठी चित्रपटाची घोषणा:

लेखक/दिग्दर्शक दिलीप भोसले हे मराठी चित्रपट सृष्टीत नावाजलेले नावं आहे. यांनी याआधी खूप उत्कृष्ट सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीला दिला आहे. “खेंगाट” या मराठी चित्रपटाद्वारे दिलीप भोसले यांनी लेखन निर्मिती आणि दिग्दर्शन  विश्वात पाऊल ठेवले होते, आणि आता ते आपला नवा चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी घेवून येत आहेत. हा चित्रपट एका वेगळ्याच संकल्पनेवर आधारित असून, मुंबई दादर येथील छबिलदास सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात  लेखक दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

लेखन, दिग्दर्शन, संगीत व अभिनेते :

हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच मे 2025 ला चित्रपटगृहात हजर होणार आहे व या चित्रपटाचे चित्रीकरण साधारण नोव्हेंबर मध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट अजून जाहीर झालेली नसुन या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन स्वतः दिलीप भोसले हेच करणार आहेत. या चित्रपटाला संगीत मराठी चित्रपट सृष्टीतील उभरते संगीतकार संजय महादेवन हे देणार आहेत. संकलक आणि डि.आय. कलरिस्ट आहेत राहुल गुरव तर डिओपी म्हणून तुषार विभुते हे काम पहाणार आहेत.  सक्षम फिल्म कंपनी प्रस्तुत हा चित्रपट मराठी, हिंदी व तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिलीप भोसले यांचा मागील चित्रपट हा हिट ठरला असून हा चित्रपट देखील सुपर-डुपर हीट असेल यात काही शंका नाही.

प्रथमच होणार AI तंत्रज्ञानाचा वापर :

नवीन तंत्रज्ञानाचा बाऊ न करता ते समजून, उमजून घेऊन त्याचा आपल्या चित्रपटात वापर करण्यात दिलीप भोसले यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या नवीन चित्रपटातून एक धमाल असे जबरदस्त कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कोणता नवीन विषय घेऊन लोकांसमोर येणार आहे? या चित्रपटाचे नाव काय असणार आहे? यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. परंतु, आतापासूनच मराठी मनोरंजन विश्वात येणाऱ्या या नवीन चित्रपटाची चर्चा जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog

'यसकर' - एका कडवट सत्याचा वेध..

'धम्मपद' - अंत:करणाला स्पर्श करणारा जीवनविवेक

पारंपरिक प्रकाशन आणि dibho.com ई-बुक प्लॅटफॉर्म - दिलीप भोसले