'क्रांतीकारी विचारांच्या सागर लाटा' - सामाजिक संघर्षाची प्रेरक कहाणी
'क्रांतीकारी विचारांच्या सागर लाटा' - सामाजिक संघर्षाची प्रेरक कहाणी
‘क्रांतीकारी विचारांच्या सागर लाटा’ हे आयु. सागर रामभाऊ तायडे यांच्या लेखनशैलीचे प्रतिनिधित्व करणारे प्रेरणादायी पुस्तक आहे. महाराष्ट्रातील कामगार चळवळीपासून आंबेडकरी विचारांपर्यंतच्या विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर त्यांचे लेखन व विचार मांडलेले दिसतात. त्यांच्या लेखनातून सामाजिक परिवर्तनाचा आग्रह स्पष्टपणे दिसतो. या पुस्तकात कामगारांच्या न्याय हक्कांपासून बहुजनांच्या सामाजिक उन्नतीपर्यंतच्या समस्यांचा सखोल वेध घेतला आहे.
आयु. सागर तायडे हे आंबेडकरी चळवळीतील परिचित नाव आहे. तीन दशकांहून अधिक काळ कामगार आणि सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले तायडे हे नाका कामगार, असंघटित कामगार, घरेलू कामगार यांसारख्या दुर्लक्षित घटकांना आवाज देण्यासाठी सतत कार्यरत राहिले आहेत. पत्रकारितेत त्यांनी विविध वृत्तपत्रांतून लेखन करून कामगार चळवळींना दिशा दिली आहे.
त्यांचा प्रवास केवळ लेखनापुरता मर्यादित नसून विविध सामाजिक कार्यांमध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग आहे. सत्यशोधक बिगारी कामगार संघटनेच्या स्थापनेपासून ते असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायक आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव असल्याचे त्यांच्या लेखनातून जाणवते.
सागर तायडे यांनी कामगार चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या लेखनात कामगारांच्या समस्यांचे सखोल विश्लेषण असून त्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यावर भर दिलेला आहे.
कामगार चळवळीत त्यांनी नुसते नेतृत्व केले नाही, तर कामगारांना भारतीय संविधानाचे महत्व पटवून देण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी कामगार हक्कांसाठी आंदोलन केले, पण सागर तायडे यांनी लेखणीच्या माध्यमातून कामगार चळवळीला वैचारिक बळ दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तायडे यांच्या जीवनाचा आणि लेखनाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या लेखनात आंबेडकरी विचारांचा ठसा उमटलेला दिसतो. विशेषतः सामाजिक न्याय, धर्मांतर आणि भारतीय संविधानाचे महत्व या मुद्द्यांवर त्यांनी सतत लेखन केले आहे.
‘क्रांतीकारी विचारांच्या सागर लाटा’ या पुस्तकात विविध सामाजिक विषयांवर लेख आहेत. प्रमुख प्रकरणे पुढीलप्रमाणे आहेत..
शिक्षणाचे महत्त्व: ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,’ या विचारावर आधारित लेखात शिक्षणाच्या सामाजिक आणि आर्थिक महत्त्वावर भर दिला आहे.
कामगार चळवळीचे भवितव्य: भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा संदर्भ देत त्यांनी असंघटित कामगारांच्या न्यायासाठी लढा देण्याचे आवाहन केले आहे.
महिला हक्क आणि चळवळ: ‘महिला दिन कोणत्या महिलांचा?’ या प्रकरणात तायडे यांनी महिला सक्षमीकरणाविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत.
बहुजन समाजाच्या उन्नतीची वाट: ‘बहुजन समाजाला नेतृत्वाची गरज’ या प्रकरणात त्यांनी बहुजन चळवळीच्या भविष्याबाबत मार्गदर्शन केले आहे.
सागर तायडे यांचे लेखन कोणत्याही तडजोडवादी विचारांशी तडजोड करत नाही. ते आंबेडकरी विचारांचे निष्ठावान समर्थक आहेत आणि संविधानाने बहाल केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. त्यांच्या लेखणीत संवेदनशीलता आणि क्रांतिकारी विचार यांचा संगम आहे.
सागर तायडे यांचे लेखन केवळ वैचारिक समीक्षणापुरते मर्यादित नाही. ते सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा देणारे आहे. कामगारांना संघटित करण्याचे त्यांचे कार्य आणि सामाजिक प्रश्नांवरील लेखन हे समाजासाठी दिशादर्शक ठरले आहे.
‘क्रांतीकारी विचारांच्या सागर लाटा’ हे पुस्तक समाजाच्या विविध स्तरांवरील समस्यांचा वेध घेणारे आणि परिवर्तनवादी चळवळीला नवा आयाम देणारे आहे. सागर तायडे यांच्या लेखणीने भारतीय कामगार चळवळ व आंबेडकरी विचारांना नवी दिशा दिली आहे. या पुस्तकाचे वाचन केवळ वैचारिक प्रगल्भतेसाठी नव्हे तर समाज परिवर्तनासाठी प्रेरणा मिळवण्यासाठी आवश्यक ठरते.
सागर तायडे यांच्या पुढील लेखन कार्याला व सामाजिक वाटचालीला अनंत शुभेच्छा!
‘क्रांतीकारी विचारांच्या सागर लाटा’ हे पुस्तक लवकरच dibho.com या आॅनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होत आहे. अवश्य वाचा.
-दिलीप भोसले
सीईओ दिभो सन्स
भारतीय चित्रपट लेखक दिग्दर्शक
सक्षम फिल्म कंपनी
संपर्क 📲 9370239533
Comments
Post a Comment